नजर मिळाली नजरेला तर ,
वादळाची भीती आहे.
नजर मिळाली न जर तर ,
सर्वच कसं शांत आहे .
वाटेवर माझे प्रेम आहे ,
तुझ्यापर्यंत घेऊन जाते ती ,
तसं तिचंही माझ्यावर प्रेम आहे .
तुझ्या माझ्या स्नेहफुलांचा
गंध काही आगळा आहे ,
सुकत सुकत गेली तरी ,
सुगंध त्यांचा वेगळा आहे .
निखळत्या ताऱ्याकडे पाहून ,
तू यावस हि इच्छा केली,
डोळे वाटेकडे लावून बसले ,
तेवढ्यात मांजर आडवी गेली.
जगाला कशाला हसायचं,
असतील शीत तर नाचतील भूत म्हणून ,
भर दुपारी स्वतः चीचं पहा ,
सावली सुद्धा राहते लपून .
सुख सुख काय घेऊन बसलात,
सम दुःखाची बोला भाषा ,
मिळतील घायाळ हृदयानाही,
नवजीवनाच्या नवीन आशा .....!
मना मनाची भाषा कसली,
इथे हृदयही विकत मिळतात,
वेळप्रसंगी पाहिजे असल्यास,
भाड्यानेही अश्रू मिळतात .
No comments:
Post a Comment
leave a comment